• Call Us96998 85000 / 97651 45000

मराठी भाषा दिन उत्साहात साजरा – प्रीती अकॅडमी लॉ कॉलेज

  • 27-02-2026, 02:02:00 pm
  • College Campus
  • 0 days left

Description

प्रीती अकॅडमी लॉ कॉलेजमध्ये दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दुपारी २.०० वाजल्यापासून महाविद्यालय परिसरात कार्यक्रमास सुरुवात झाली आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला..

Key Highlights

या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांनी मराठी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहून मराठी संस्कृतीचा अभिमान व्यक्त केला. विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये समूह नृत्य, मराठी गीत सादरीकरण, तसेच भाषण स्पर्धा यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवून मराठी भाषा आणि संस्कृतीविषयी आपली भावना व्यक्त केली. कार्यक्रमात मराठी भाषेचे महत्त्व, तिची समृद्ध परंपरा आणि साहित्यिक वारसा यावर प्रकाश टाकण्यात आला. हा कार्यक्रम प्रभारी प्राचार्य डॉ. मोहित चोबदार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. अशा उपक्रमांद्वारे महाविद्यालय मराठी भाषा व सांस्कृतिक परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यास कटिबद्ध आहे..